Manic Readers
Authors
Close
Publishers
Books
Reviews

Manaswini Manaswini

मनस्विनीबद्दल मी काय लिहू? मनस्विनी एक ageless, timeless व्यक्तिमत्व आहे, जिनं तिच्या आयुष्यात बरच पाहिलं, सोसलं आणि उपभोगलंही. कष्टांची चांगली सवय आहे पण नशिबाशी झुंज द्यावी लागते. समाजात मुलगी म्हणून डावललं जाणं, भ्रष्टाचारी समाजात पिळवणूक, शोषण, नाकारलं जाणं हे तर नेहमीचेच आहे पण तरीही सर्व स्विकारून हसत मुखाने पुढे वाटचाल करीत रहाणं हा तिचा स्वभावाच बनत गेला. निराशेत आशावाद शोधून, मिळेल त्या संधीचा सकारात्मक उपयोग करून घेण्याची कला, मनस्विनीने चांगली अवगत केली आहे. तिच्या बोलण्यात तडक फडकपणा जरूर आहे, पण कटुता नाही. तिची जिद्द, विकट परिस्थितीत मार्ग काढण्याचा इरादा, संपर्कात आलेल्या माणसांना नेहमीच जाणवतो. आयुष्यातील टचपे टोणपे खात खात एक प्रकारची स्थितप्रज्ञता येते, ती तिच्या व्यक्तिमत्वाला सुशोभित करते.

 

मनस्विनीला दुनियेचा अनुभव आहे - विविध नोकऱ्या केल्या पण शेवटी शिक्षिकेचा पेशा नियतीने दिला आणि ब्राह्मण घरच्या मुलीला कलीयुगात धर्मपालनाची सुवर्णसंधी लाभली. पुण्यात लहानाची मोठी झालेल्या मनस्विनीने, एक उत्कृष्ठ शिक्षिकेची भूमिका मुंबई नगरीत निभावली. मुंबईच्या गजबजाटात आणि अठरा पगड लोकांच्यात एक विद्वान, घरंदाज आणि संस्कारी व्यक्ती म्हणून तिची ओळख, नावलौकिक होत गेला. विविध प्रांतातील, विविध स्थरातून आलेल्या तिच्या विद्यार्थ्यांकडून, त्यांच्या पालकांकडून मिळणारं प्रेम, आदर आणि विश्वास हाच तिच्या जॉब मधील बोनस!

 

पुढे मनस्विनी परदेशात स्थायिक झाली आणि मुंबईची शान आता संपूर्ण जगात झळकायला लागली. इंटरनेशनल एक्सपोझर मिळाल्यावर तिचे विचार अधिक प्रगल्भ होत गेले, आपण कोण, आपली संकृती कशी महान आहे पण आपण कुठे कमी पडतो आहोत आणि बिना विचाराने कसे मुर्खपणाने अंध अनुकरण करतो याची हळहळ तिला वाटते. परदेशाचं अल्प दर्शन घडलेल्या व्यक्ती केवळ बाह्य अनुकरण करतात, परदेशीय लोकांची भरभराट, समृद्धी, हुशारी, व्यवस्थापन पाहून प्रभावित होतात, पण यामागील त्यांची प्रामाणिकता, दूरदृष्टी, नागरी कर्तव्ये, शिस्त, चिकाटी बघत नाहीत. सोयीस्करपणे हे सर्व दुर्लक्षित करून आपल्या सिस्टीमलाच दोष देतात.

 

तिच्या लिखाणात गतकाळाचे वर्णन, वर्तमानाची वस्तुस्थिती आणि पुढे येणाऱ्या भविष्यकाळासाठी सूचना बरेचदा दिसतात. नकळत विविध समाजातील समाज रचनेची तुलना होते, वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांचे विचार मांडले जातात, देशी-विदेशी आचार विचार व रहाणीमानातील फरक दर्शवतात. काय चूक, काय बरोबर याचा विचार करायला भाग पाडतात. मनस्विनीच्या लिखाणाचे, कवितांचे विषय म्हणजे विचारवंत वाचकांची जणू पर्वणीच. नव्या पिढीला जुन्या काळची शब्दचित्रे रेखाटून ती आपल्या समृद्ध संस्कृतीचा वारसा, परंपरेची ओळख करून देते. छोट्या छोट्या प्रसंगातून त्या वेळची परिस्थिती रंगवण्याची हातोटी उल्लेखनीय आहे. तिच्या कवितांचे गूढ गुंजन केल्यास विचारांतील गहराई दिसून येते आणि अध्यात्मिक पातळीची अनुभूति होते. तिचे स्वगत, सहजगत्या पण अहं प्रश्र्न विचारण्याची पद्धत अनोखी आहे.

 

मराठी लिखाणात दर्ज्या न घालवता, जुन्याच्या पार्श्र्वभूमीवर आजचं कॉनटेमपररी लिखाण करण्याचा प्रयास मनस्विनी करते. मराठी भाषेतील वाचकांना एक फ्रेश ऑक्सिजनचा वाफारा मिळेल! टी व्ही, फिल्म, इंटरनेटच्या जगात पुस्तक रसिकांचे मनोरंजन व्हावं व त्यांना पाहून अधिक अधिक जणांनी वाचनाकडे वळावं अशी अशा ती करते. तिचं हे काम हळूहळू, पण ठोस पाउलांनी या प्रगतीपथावर जाणीव पूर्वक आगेकूच करत आहे. क्षणिक गाजून सेलेब्रिटी बनण्यात काय फायदा, खऱ्या अर्थाने तिला हिरोईन व्हायचं आहे, मराठी भाषेची सेवा करायची आहे, खरं नाव कमवायचं आहे, ना की क्षणभंगूर प्रसिद्धी आणि त्याहूनही क्षणभंगूर, निसटणारी दमडी!

Manaswini's MR Links
Free Reads!
Anubhuti
Athwani - 1
Athwani - 2

MR Publishers
Smashwords
Current Releases
Athwani – 2 is a sequel to Athwani – 1 with more stories from Manaswini's life experiences. The focus shifts to delivering finer details of incidents than being pure memoirs. Story lines include people and society, childhood times, ex...
Available Now!
Athwani - 2
Athwani - 1 is the first instalment of Manaswini's short stories written in 'laghukatha' style. Each story is a lucid narration as if she is talking to us readers, telling us stories from her grandma's times, her mom's and the pre...
Available Now!
Athwani - 1
Anubhuti is a unique collection of Marathi poetry which are Manaswini's life experiences. Each of the poems capture different walks of life, in different moods and cover a wide range of topics from personal feelings to social norms, questioning &...
Available Now!
Anubhuti


Visit Manaswini Manaswini's website: manaswinispeaks.blogspot.co.uk
Contact Us   |   Terms of Use   |   Privacy / Refund Policy   |   Sitemap

© 2007- 2019, Manic Readers, LLC